नवी दिल्ली – बहु-क्षेत्रीय आणि आर्थिक सहकार्यासाठी बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह – अर्थात बिम्स्टेकच्या सदस्य देशांच्या परदेशी सेवा अकादमीच्या शिक्षकांसाठी पाच दिवसीय विनिमय कार्यक्रम काल प्रथमच ढाका येथे सुरू झाला.
विनिमय कार्यक्रमादरम्यान, बिम्स्टेक सदस्य देशांचे राजनयिक दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियाई उप-प्रादेशिक मंचाच्या परदेशी सेवा प्रशिक्षण संस्थांमधील परस्पर सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत.
सात देशांतील विदेशी सेवा अकादमीतील तेरा शिक्षक या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, असे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
बिम्स्टेक ही सात दक्षिण आशियाई आणि आग्नेय आशियाई देशांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. यात बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड. हे सर्व देश बंगालच्या उपसागरावर अवलंबून आहेत.