WPL Live Cricket Score, UPW vs GG Women’s Premier League 2024 : आज एम चिन्नास्वामी स्टेडियमवर यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा आठवा सामना खेळला जात आहे. यूपीने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.
बेंगळुरू येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात यूपी वॉरियर्सची कर्णधार ॲलिसा हिलीने नाणेफेक जिंकून गुजरात जायंट्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात ताहलिया मॅकग्राला विश्रांती देण्यात आली आहे. तिच्या जागी चामरी अटापट्टू हिचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर गुजरात जायंट्सही दोन बदलांसह खेळताना दिसणार आहे. ताहुहूच्या जागी लॉरा वोल्वार्डला संधी मिळाली आहे तर वेदाच्या जागी मन्नत कश्यप खेळताना दिसणार आहे. या सामन्यातील पहिला चेंडू 7.30 वाजता टाकला जाईल.
🚨 Toss Update 🚨@UPWarriorz elect to field against @Giant_Cricket
Live 💻📱https://t.co/4LUKvUMAOB#TATAWPL | #UPWvGG pic.twitter.com/uzvfW8Ri7X
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 1, 2024
UPW vs GG Live Score : दोन्ही संघाची प्लेइंग 11
गुजरात जायंट्स : हरलीन देओल, बेथ मुनी (wk/c), फोबी लिचफिल्ड, लॉरा वोल्वार्ड, ऍशले गार्डनर, डेलन हेमलता, कॅथरीन ब्राइस, स्नेह राणा, तनुजा कंवर, मन्नत कश्यप, मेघना सिंग.
यूपी वॉरियर्स : ॲलिसा हिली (wk/c), किरण नवगिरे, चमारी अथापथू, ग्रेस हॅरिस, दीप्ती शर्मा, सायमा ठाकोर, श्वेता सेहरावत, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड.