वाह.! क्या बात; भाचीला कन्यारत्न झाल्याच्या आनंदात पेट्रोल पंप मालकाची ग्राहकांसाठी मोठी ऑफर

भोपाळ- दिवसेंदिवस प्रत्येक राज्यामध्ये पेट्रोल- डिझेलच्या किंमतीचा भडका उडत असल्याचे दिसून येत आहे. अश्यातच एका पेट्रोल पंप मालकानं कुटुंबात मुलीचा जन्म झाला म्हणून आपल्या ग्राहकांना एक भली मोठी ऑफर दिली आहे. ही ऑफर ऐकून ग्राहकांना सुद्धा जोरदार धक्का बसला आहे.

मध्य प्रदेशातील बैतूलचे रहिवासी असलेले पेट्रोल पंप संचालक ‘राजेंद्र सेनानी’ यांना आपल्या दिव्यांग भाचीला कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर अतिशय आनंद झाला. आपला आनंद इतरांशीसोबत वाटण्यासाठी सेनानी यांनी चक्क ग्राहकांना 10 टक्के पेट्रोल मोफत देण्याची घोषणा केली आहे.

इटारसी रोडवरील सर्व्हिस पेट्रोल पंपावर दिनांक 13, 14 आणि 15 ऑक्टोबर असे तीन दिवस सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या भन्नाट ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

तर दुसरीकडे ग्राहकांना 100  रुपयांच्या पेट्रोलवर 5  टक्के आणि 200 ते 500 रुपयांच्या पेट्रोलवर 10 टक्के अतिरिक्त पेट्रोल देण्यात आलं. सध्या राजेंद्र सेनानी यांच्या पेट्रोल पंपावर तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. अनेकांनी या ऑरचा लाभ घेतला असून, सेनानी यांच्या या अनोख्या संकल्पनेचं कौतुकही केलं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.