मुंबई – फ्लेचर पटेल कोण आहे? फ्लेचर पटेल आणि समीर वानखेडे यांच्यात काय संबंध आहेत? अशी विचारणा करत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीला लक्ष केले आहे. मलिक यांनी ट्वीट केले असून त्यांच्या या ट्वीट मुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
Fletcher Patel seen in this picture with someone who he calls 'My Lady Don'.
Who is this 'Lady Don' ? pic.twitter.com/epTRSopDcH— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 16, 2021
फ्लेचर पटेल कोण आहे? फ्लेचर पटेल आणि समीर वानखेडे यांच्यात काय संबंध आहेत? अशी विचारणा करत मलिक यांनी ट्वीट मध्ये फ्लेचर पटेल यांचे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
This is Fletcher Patel pic.twitter.com/6LgYV4NIWd
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 16, 2021
मनिष भानुशाली याने मी खबरी असल्याचे सांगितले. गोसावी हा फरार आरोपी आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत 2 तारखेच्या आधी आपण त्यांना ओळखत नव्हतो असे सांगितले. स्वतंत्र पंच असल्याचे एनसीबीने सांगितले असून मी त्याबाबतीत आज प्रश्न उपस्थित करत असल्याचे मलिक यांनी सांगितले आहे.
एनसीबीने हा फ्लेचर पटेल कोण आहे याचा खुलासा करावा. समीर वानखेडे यांच्याशी त्यांचा काय संबंध आहे? त्यांच्या कुटुंबातील लोकांसोबत ते फोटो टाकत आहेत. माय लेडी डॉन सिस्टर नावाने टॅग करत आहेत. समीर वानखेडे यांचा या फ्लेचर पटेलशी काय संबंध आहे?,” अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे.
कोणतीही केस उभी करायची असते तेव्हा ज्या ठिकाणी घटना घडते तेव्हा तेथील प्रतिष्ठीत नागरिक, आजुबाजूची लोक यांना बोलवून पंचनामा करणं कायदेशीर तरतूद असल्याचे मलिक यांनी सांगितले आहे.
गेल्या एक वर्षातील माहिती घेतली असता एनसीबीने तीन केसेसमध्ये स्वतंत्र पंच म्हणून फ्लेचर पटेल यांचे नाव आहे. याचा अर्थ स्वतंत्र पंच यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत.
ही कारवाई ठरवून केली असल्याचे हे यातून स्पष्ट होत आहे. कोर्टाने अनेकदा स्वतंत्र पंच अनेक केसमध्ये असल्यास यात तथ्य नाही असा निष्कर्ष काढला आहे. याचा अर्थ एनसीबीच्या माध्यमातून फर्जीवाडा सुरु आहे. असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.