वाघोली – वाघोली येथील ग्रीन सनराईज हिल येथे वनविभागाच्या सहाय्याने जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
पर्यावरण दिन व ग्रीन सनराईज हिल फाउंडेशनच्या स्थापनेला पाच वर्ष पूर्ण झाले असल्याने वनविभागाचे पुणे मुख्य वनसंरक्षक सुजित दोडल, रंगनाथ नाईकडे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून हिल परिसरात लागणाऱ्या आगीला रोखण्यासाठी स्वतंत्र मार्ग उभारण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.
ग्रीन सनराईज फाउंडेशनने गेल्या पाच वर्षामध्ये केलेल्या कामाचे कौतुक यावेळी उपस्थितांनी केली. त्याचप्रमाणे निसर्ग संवर्धन व सरांक्षणाची शपथ घेण्यात आली. यावेळी वनविभागाचे कर्मचारी, अधिकारी, ग्रीन सनराईज हिलचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.