नवी दिल्ली – राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात जागतिक दर्जाची पर्यटन स्थळे विकसित केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर, चंबळ नदीच्या काठावर “चंबळ रिव्हर फ्रंट’ विकसित करण्यात येत आहे. या रिव्हर फ्रंटचे मुख्य आकर्षणाचे केंद्र असेल ती चंबळ मातेची भव्य मूर्ती. ही मूर्ती व्हिएतनाममधून आयात करण्यात आली आहे.
शहरी विकास आणि स्वराज्य मंत्री शांती धारीवाल यांच्या निर्देशानुसार कोटा येथे जागतिक दर्जाची पर्यटन स्थळे विकसित केली जात आहेत. चंबळ रिव्हर फ्रंटवर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या 242 फूट उंचीच्या (73.8 मीटर्स) जगातील सर्वात उंच चंबळ मातेच्या मूर्तीचे काम पूर्ण झाले आहे. या पुतळ्यासाठी व्हिएतनाम मार्बलचा वापर करण्यात आला आहे.
सुमारे 1500 तुकड्यांमध्ये हा पुतळा तयार करण्यात आला आहे. एक-दोन दिवसांत पुतळ्याभोवतीची रचना हटवली जाईल. यानंतर पुतळ्याजवळ बसविण्यात आलेल्या जड क्षमतेच्या पंपाची चाचणी घेण्यात आली. भव्य उद्घाटनानंतर दररोज चंबळ मातेची सायंकाळची आरती करण्यात येणार आहे.
चंबळ मातेच्या मूर्तीवरून येणारा पाण्याचा प्रवाहही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. पुतळ्याच्या खाली पाच हत्तींचे पुतळे स्वागत करताना दिसतील. या पुतळ्याच्या कलशातून येणारा पाण्याचा प्रवाह पर्यटकांना आकर्षित करेल. पुतळ्याच्या कलशातून दर तासाला 7 लाख 60 हजार लिटर पाणी वाहून जाईल. या पाण्याचा पुनर्वापर करून पंपांच्या माध्यमातून पुन्हा कलशातून खाली पडेल.