Lok Sabha Election 2024 : राजस्थानातील १२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. यावेळी राजस्थानात कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टीने एकाही मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही. भाजपचे एक वेळ समजण्यासारखे आहे. मात्र कॉंग्रेसकडून पहिल्यांदा असे करण्यात आले आहे. त्यांनी किमान एकतरी मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवण्याचे पथ्य पाळले होते.
२००९ मध्ये चुरू येथून मकबूल मंडेलिया, २०१४ मध्ये टोंक- सवाई माधोपूर येथून माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन, २०१९ मध्ये चुरू येथूनच रफिक मंडेलिया यांना उमेदवारी दिली होती. तथापि, पक्षाचे हे तीनही उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाले होते. तरीही कॉंग्रेसकडून त्यांना उमेदवारी दिली जात होती. । Muslim candidate । Lok Sabha Election
मात्र यावेळी कॉंग्रेसने तसे का केले नाही असे विचारल्यावर पक्षातील सूत्रांनी सांगितले की आम्ही उमेदवारी देण्यास तयार होतो. मात्र मुस्लिम समुदायातीलच कोणी उमेदवार निवडणूक लढण्यास इच्छुक नव्हता. रफिक खान यांना जयपूर येथून तिकिट हवे होते. त्यांना ते मिळाले नाही.
आकडेवारीनुसार कॉंग्रेसने राजस्थानात आतापर्यंत ९-१० मुस्लिम नेत्यांना १३ वेळा लोकसभेचे उमेदवार केले गेले आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या विरोधात १९९९ मध्ये डॉ. अबरार अहमद यांना उमेदवारी देण्यात आली होती.
त्यांचा पराभव झाला होता. झुंझुनू येथून कॉंग्रेसचे अयूब खान १९८४ आणि १९९१ मध्ये विजयी झाले होते. त्यांच्या व्यतिरिक्त एकही मुस्लिम उमेदवार जिंकला नाही. राजस्थानात अल्पसंख्यकांची लोकसंख्या ११.४ टक्के आहे.
११ लोकसभा मतदारसंघात १७ टक्के मुस्लिम राहतात. तरीही दोन्ही प्रमुख पक्षांकडून एकही मुस्लिम उमेदवार दिला गेला नाही. दरम्यान, अलवर मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाने एका मुस्लिमाला तिकीट दिले आहे. । Muslim candidate । Lok Sabha Election