लोणावळा (वार्ताहर) – संकल्प नशामुक्त अभियानांतर्गत लोणावळा येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता कार्यशाळा घेणअयात आली. त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिंहगड इंस्टिट्यूट, कुसगाव बु. संस्थेतील एकुण ८ विविध विभागाच्या महाविद्यालयामधील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, कोऑर्डीनेटर, एनएसएस, एनसीसी व इतर सर्व विध्यार्थी यांच्यासाठी ही विशेष कार्यशाळा झाली.
लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांचे मार्गदशानाखाली व लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांचे संकल्पनेतून पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून संकल्प नशामुक्त अभियान राबविण्यात येत आहे.
सत्यसाई कार्तिक यांनी दिलेल्या सूचनेनुसार कॉलेजमधील जे विद्यार्थी विविध प्रकारच्या नशेच्या आहारी गेलेले आहेत, त्यांची माहिती संकलीत करणे. कोणी नशा करत असल्यास अथवा अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती असल्यास त्याबाबत पोलिसांना माहिती कळवणे. कॉलेजमध्ये समुपदेशन कक्ष स्थापन करणे.
नशा करणाऱयांचे समुपदेशन करणे, पालकांना बोलावून त्यांचे करवी मार्गदर्शन करणे. महाविद्यालगत असलेली पोलीस चौकी सक्रीय करून त्याठिकाणचे पोलीस स्टाफच्या मदतीने कॉलेज कॅम्पस व हॉस्टेल परिसरात पेट्रोलींग करण्यात येणार असून कॉलेजमधील विद्यार्थी यांच्यावर कॉलेज प्रशासन व पोलीस प्रशासनाचे मार्फतीने विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.