महिलांच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक तयार

मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिलांसाठी मिनी आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्या स्पर्धेची तारिख संभाव्य संघ आणि खेळाडू यांच्या बाबत कोणतीही माहिती त्यावेळी बीसीसीआय कडून उपलब्ध केली गेली नव्हती. मात्र, आता महिलांच्या आयपीएलचे वेळापत्रक तयार केले गेले असून त्या नुसार 6 ते 11 मे या कालावधीत तीन संघांमध्ये ही लीग खेळवण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी अशी तीन सहभागी संघांची नावे असणार आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात येतील आणि त्यात भारत व जगातील अव्वल महिला क्रिकेटपटू सहभाग घेणार आहेत. हे तीनही संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळतील आणि अव्वल दोन संघ अंतिम फेरीत भिडणार आहेत. अशी माहिती बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

गतवर्षी आयपीएलमध्ये दोन संघांमध्ये महिलांची आयपीएल स्पर्धा खेळवण्यात आली होती. त्यात स्मृती मानधनाचा ट्रेलब्लेझर्स आणि हरमनप्रीत कौरचा सुपरनोव्हाज संघ यांच्यात सामने झाले होते. या प्रदर्शनीय सामन्यात एलिसा पेरी, मेग लॅनिंग, एलिसा हिली, बेथ मूनी, सूजी बेट्‌स आणि सोफी डेव्हीयन या दिग्गज महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता. गतवर्षी प्रमाणे या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. अजुन संघ आणि सहभागी खेळाडूंबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

स्पर्धेचे वेळापत्रक :

6 मे – सुपरनोव्हाज वि. ट्रेलब्लेझर्स
8 मे – ट्रेलब्लेझर्स वि. व्हॅलोसिटी
9 मे – सुपरनोव्हाज वि. व्हॅलोसिटी
11 मे – अंतिम सामना

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.