निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी अरुण गवळी दगडी चाळीत परतणार

28 दिवसांची संचित रजा मंजूर

नागपूर – गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला संचित रजा (पॅरोल) मंजूर झाली आहे. महाराष्ट्रातील निवडणूक टप्पा पार पडल्यानंतर त्याला मंगळवार, दि. 30 एप्रिलला मुंबईत परतणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली.

अरुण गवळीने संचित रजेसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर न्यायाधिश झेड. ए. हक आणि न्या. विनय जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी अरुण गवळी यांच्या वतीने ऍड. राजेंद्र दागा यांनी युक्‍तीवाद केला. या याचिकेवर सुनावणी करताना नागपूर खंडपीठाने गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली. अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

विशेष म्हणजे, अरुण गवळी याआधीही 2 ते 3 वेळा जेलबाहेर आला आहे. मुलाचे लग्न, आजारपण अशी कारणे देत अरुण गवळी कारागृहाबाहेर आला होता. आता पुन्हा अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहाबाहेर येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.