नवी दिल्ली – एफआयएच महिला हॉकी विश्वकरंडक स्पर्धेतील भारतीय महिला संघाचे आव्हान संपूष्टात आले. या स्पर्धेत झालेल्या क्रॉसओव्हर सामन्यात भारताला स्पेनकडून 1-0 असा निसटता पराभव पत्करावा लागला.
उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक होते. मात्र, पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपले आहे. या सामव्यात एकमेव गोल स्पेनच्या मार्टा सेगू हिने केला. भारतीय संघाला आता कॅनडाशी लढत द्यावी लागणार आहे. हा सामना 9 ते 16 या स्थानासाठी होणार आहे.
Full Time!#WomenInBlue fell short against Spain after powerful gameplay.
ESP 1:0 IND#HockeyIndia #IndiaKaGame #HWC2022 #HockeyInvites #HockeyEquals #ChakDeIndia #MatchDay @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/DBkvuyO1jT
— Hockey India (@TheHockeyIndia) July 10, 2022
भारतीय महिला हॉकी संघाला या स्पर्धेत न्यूझीलंडकडूनही पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेत आतापर्यंत भारतीय महिला हॉकी संघ एकही सामना जिंकू शकलेला नाही. इंग्लंड व चीनविरुद्धचे सामने 1-1 असे बरोबरीत सुटले होते.