हैदराबाद – तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यावेळीही राव यांनी मोदींना लक्ष्य केले होते. त्यावरून आता तेलंगणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांनी राव यांच्यावर टीका केली आहे. तसेच राव यांच्या टीआरएसमध्ये अनेक एकनाथ शिंदे आहेत व राव यांच्या उलट गिणती सुरू झाली आहे, असा दावा त्यांनी केला.
बंदी संजय म्हणाले की, राव स्वत:ची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करतात. मात्र, मोदी यांची अनेक राज्यांत सत्ता आहे. ते दिवसातले 18 तास काम करतात. राव त्यांच्या फार्महाउसमधून बाहेर पडत नाहीत. ते चीन आणि पाकिस्तानची प्रशंसा करतात. मात्र, भारताच्या सर्जिकल स्ट्राइकर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. त्यांनी आपल्या राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दराची किंमत अन्य राज्यांतील दराशी केली पाहिजे.
विजेचे दर त्यांनी वाढवले आहे. ते सारख एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलतात त्यांच्या पक्षातच अनेक एकनाथ शिंदे आहेत. त्यांचा मुलगा (केटीआर) मुलगी (कविता) किंवा पुतण्या हरिश रावसुध्दा एकनाथ शिंदे होऊ शकतात.
लोकसंख्येत वर्षभरात भारत चीनला टाकणार मागे…
राव यांनी करिम नगर येथे हिंदू विरोधी वक्तव्य केले होते. तेव्हापासून तेथील राजकीय दारे त्यांच्यासाठी बंद झाली आहेत. आता त्यांनी पुन्हा हिंदू देवतेच्या विरोधात वक्तव्य केले आहे. यावरून राव यांचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे सिद्ध होत आहे, असे संजय यांनी म्हटले आहे.
‘अग्निपथ’बाबत संसदीय समितीची बैठक; सुप्रिया सुळेंनी ट्विट करत दिली माहिती…