मुंबई – इंटरनेटवर सर्वाधिक वापरलं जाणारं सर्च इंजिन गुगलने आज एक खास डूडल तयार केलं आहे. त्याच कारण देखील तितकंच खास आहे. आणि त्यामुळेच हे खास डुडल तयार करण्यात आले आहे. आज ‘8 मार्च’ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. गुगलनेही महिलांच्या सन्मानासाठी एक स्पेशल डूडल बनवले आहे. गूगल ने आपल्या इंटरॅक्टिव डूडल मध्ये डेली लाइफमध्ये महिलांच्या योगदानाला दर्शवलं आहे.
या डूडलमध्ये गूगलने प्रत्येक क्षेत्रातील महिलांच्या योगदानाची झलक दाखवण्याचा प्रयत्न केलाय. गुगल प्रत्येक खास दिवशी डूडल बनवत असते. आणि आपल्या डूडलच्या माध्यमातून गूगल त्या प्रत्येक खास दिवसाला आणखी खास दाखवण्याचा प्रयत्न करत असते. महिलांनी सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक आर्थिक विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे.
युनेस्कोच्या म्हणण्यानुसार, ‘न्यूयॉर्कमध्ये 1908 च्या गारमेंट कामगारांच्या संपाच्या सन्मानार्थ अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने 28 फेब्रुवारी 1909 रोजी पहिला राष्ट्रीय महिला दिन साजरा केला होता. जिथे महिलांनी कठोर कामाच्या परिस्थितीचा निषेध केला होता. नंतर डिसेंबर 1977 मध्ये, जनरल असेंब्लीने एक ठराव मंजूर केला ज्यामध्ये महिला हक्क आणि आंतरराष्ट्रीय शांतता दिन हा सदस्य राष्ट्रांनी त्यांच्या ऐतिहासिक आणि राष्ट्रीय परंपरेनुसार वर्षातील कोणत्याही दिवशी साजरा केला जावा असे घोषित केले.
शेवटी, 1977 मध्ये युनायटेड नेशन्सने दत्तक घेतल्यानंतर, आंतरराष्ट्रीय महिला दिन ‘8 मार्च रोजी’ महिलांच्या हक्कांसाठी आणि जागतिक शांततेसाठी संयुक्त राष्ट्रांची अधिकृत सुट्टी म्हणून चिन्हांकित करण्यात आला. आणि तेव्हा पासून ‘8 मार्च रोजी’ महिला दिन साजरा करण्यात येत आहे.