जळोची, पिंपळीतील महिलांवर उपासमारीची वेळ : बारामतीत उपोषण सुरू
बारामती- वनविभागाच्या नर्सरीमध्ये गेली दहा वर्ष कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या महिलांना कामावरून कमी केले आहे. त्यामुळे महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी (दि.27) पासून वनविभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली असल्याचे महिलांनी यावेळी सांगितले. जळोची व पिंपळी येथील महिलांचा उपोषणात सहभाग आहे.
वनविभागाच्या नर्सरीमध्ये दहा वर्ष मजूर म्हणून काम करीत होत्या. मात्र, महिलांना सध्या कामावरून कमी करण्यात आले आहे. अगोरदरच करोना आणि त्यात हाताला काम नाही. त्यामुळे महिलांचा कुटुंबांचा चरितार्थ चालविणे जिकिरीचे झाले आहे. महिलांनी वरिष्ठांकडे पाठपुरावा करून देखील कामावर घेतले नाही.
कामावर घ्यावे यासाठी वेगवेगळ्या राजकीय पदाधिकारी यांच्याकडे देखील विनवणी केली. मात्र, कोणीही दखल घेतली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील तक्रार केली होती. त्यांनी तशा सूचना संबंधितांना दिल्या होत्या. मात्र, महिलांना कामावर घेतले नाही. असे उपोषणकर्त्या सविता झगडे यांनी सांगितले.
- महिलांना कामावर घेण्यासाठी निधी मिळविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. अद्याप अनुदान दिले नसून काम सुरू करण्यास शासनाची मंजुरी नाही. निधी व मंजुरी मिळाल्यानंतर सर्व महिलांना कामावर घेतले जाईल. पुणे औद्योगिक कामगार न्यायालय येते. ही बाब न्यायप्रविष्ट आहे.
– राहुल काळे, प्रभारी वनाधिकारी, बारामती.