माढा : सहाय्यक शिक्षण प्रसारक मंडळ बारलोणी संचालीत ‘शरद विद्यालय बारलोणी’ येथील SSC 2020 या वर्षाच्या बोर्डचा निकाल 100% लागलाआहे.
प्रथम क्रमांक सुरज दत्तात्रय आतकर 93.20% , द्वितीय क्रमांक कु.कोमल हनुमंत मस्तुद 91.20%, तृतीय क्रमांक वैभव हरिदास दळवी 87.20% गुण मिळवले असून तिन्ही विद्यार्थ्यांचे शरद विद्यालयाच्या वतीने कौतुक करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी शरद विद्यालय बारलोणी या शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश [बापू ] बागल, सचिव सुधीर आप्पा गणदास व संचालक सर्जेराव मोरे नवनाथ नांदे सर, शाळेचे मुख्याध्यापक पोपट चव्हाण सर व सर्व शिक्षक स्टाफ यांनी तीनही मुलांचे कौतुक केले.