BCCI To Host 2 IPL in One Calendar Year : इंडियन प्रीमियर लीगबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) वर्षातून दोनदा ही लीग आयोजित करण्याची योजना आखत आहे. सध्या या लीगचा 17वा हंगाम 22 मार्चपासून खेळवला जाणार आहे. आयपीएल 2024 ची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने होणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे, याआधी टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही एका वर्षात दोन आयपीएलबाबत चर्चा केली होती. एका वर्षात दोन आयपीएल याबद्दल रवी शास्त्रीच सर्वप्रथम बोलले असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. या लीगची लोकप्रियता लक्षात घेता एका वर्षात लवकरच दोन आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते, असे ते म्हणाले होते.
एका वर्षात दोन आयपीएलसाठी बीसीसीआय विंडो शोधत आहे?
बीसीसीआयसमोर योग्य विंडो शोधणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. किंबहुना, वर्षभरात दोन आयपीएल खेळणे शक्य होईल जर वर्षभरात आयसीसीचा कोणताही कार्यक्रम नसेल किंवा अनेक द्विपक्षीय मालिका आयोजित केल्या गेल्या नसतील.
आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी हे आव्हान स्वीकारले. मात्र, पर्याय शोधण्याबाबतही ते बोलले. “आम्हाला 84 सामने आणि नंतर 94 सामन्यांसाठी विंडो शोधण्याची गरज आहे,” असे त्यांनी टेलिग्राफला सांगितले.
IPL T20 ऐवजी T10 फॉरमॅटमध्ये होणार का?
एका वर्षात दोन आयपीएलसाठी विंडो शोधणे बीसीसीआयसाठी सोपे जाणार नाही. होय, हे शक्य आहे की BCCI दुसऱ्या आयपीएलचे T20 ऐवजी T10 फॉरमॅटमध्ये आयोजन करू शकते. अशा परिस्थितीत कमी विंडोत सामने होऊ शकतात. मात्र, आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी टी10 फॉर्मेटबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याची पुष्टी केली आहे. मात्र, भविष्यात कोणताही निर्णय खेळाच्या हिताचा विचार करून घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.