नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिल्लीच्या रामलीलाल मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर सहा मंत्र्यांनीही यावेळी शपथ देण्यात आली. परंतु मंत्रिमंडळात एकही महिलांचा समावेश नाही.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने नऊ महिला उमेदवारांना तिकीट दिले होते. त्यापैकी आठ महिला विधानसभा निवडणूक जिंकल्या आहेत. नऊ महिलांपैकी केवळ सरिता सिंह या रोहितास मतदार संघातून पराभूत झाल्या आहेत.
या निवडणुकांमध्ये काँग्रेसने सर्वाधिक 10 महिलांना उमेदवारी दिली होती तर भाजपने केवळ 6 महिला उमेद्वानांना तिकीट दिले होते. झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने महिला प्रश्नावर अधिक भर दिला होता. त्यात महिलांना मोफत बस सुविधा, महिला सुरक्षा, आरोग्य, शिक्षण आदी विषयाचा समावेश होता.
या आहेत ‘आप’च्या विजयी महिला आमदार
अतिशी मार्लेना (कालकाजी)
राखी बिर्ला (मंगोलपुरी)
राज कुमार ढिल्लों (हरी विहार)
प्रीती तोमर (त्रिनगर)
धनवती चंदेला (राजौरी नगर)
परमिला टोकस (आरके पुरम)
भावना गौर (पालम)
वंदना कुमारी (शालीमार बाग)