वाघोली – वाघोली तालुका हवेली येथे सुपर कन्स्ट्रक्शन साइटवर काम करत असताना एका कामगार महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी बाराच्या सुमारास घडली या घटनेत लक्ष्मी नारायण महुरे( वय – ३० वर्षे) रा. लेबर कॉलनी, वाघोली हीचा अपघाती मृत्यू झाला असून लोणीकंद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बांधकाम साईट वर साफ सफाईचे काम चालू असताना लक्ष्मी महुरे ह्या काम करत असताना फायर डग मधे तोल जाऊन पडल्यानंतर जमिनीवरील असणाऱ्या सहित्यामधील लोखंडी सळई तिच्या पोटात घुसून तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पीएमआरडीए च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुपर कन्स्ट्रक्शन साईट
तथा डिफेन्स कॉलनी फेज चार चे बांधकाम मनाईचे आदेश संबंधित बांधकाम व्यावसायिकाला दिले होते.
तरी देखील काम सुरू ठेवल्याने संबंधित महिलेचा घटनास्थळी बांधकामावर काम करत असताना अपघाती मृत्यू झाला असून या ठिकाणी संबंधित बांधकाम व्यवसायिकांने कोणत्याही सुरक्षितेच्या उपाय योजना केल्या नसल्यामुळे महूरे नावाच्या महिलेचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला असून सदर मृत्यूस संबंधित बांधकाम व्यावसायिक जबाबदार असून त्याच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी घटनास्थळी हजर असणारे गौरव सातव व इतर यांनी मा.पोलीस आयुक्त पुणे शहर, पोलीस आयुक्तालय, जिल्हाधिकारी पुणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे यांच्याकडे तक्रार निवेदनाद्वारे केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुभाष पाटील हे करत आहेत.
वाघोली तालुका हवेली येथील सुपर कन्स्ट्रक्शन च्या डिफेन्स कॉलनी फेज चारच्या साइटवर पीएमआरडीए बांधकाम सुरू न करणे बाबत चा आदेश असताना देखील संबंधित बांधकाम व्यावसायिकाने लॉक डाऊन च्या काळात कोवि ड रोगाच्या प्रादुर्भावाची तीव्रता लक्षात घेऊन कोणतीही उपाययोजना न करता तथा सुरक्षिततेच्या बाबतीत देखील कोणतीही उपाययोजना न केल्याने संबंधित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या मृत्यूस संबंधित बांधकाम व्यावसायिक जबाबदार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी
गौरव सातव , प्रत्यक्षदर्शी ,नागरिक वाघोली
सदर बांधकामाबाबत यापूर्वी पीएमआरडीए च्या वतीने मनाई आदेश दिला होता. मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा आदेश मंत्रीमहोदयांनी पीएमआरडीए च्या अधिकाऱ्यांना काढण्यास सांगितले होते. पीएमआरडीए च्या वतीने करण्यात आलेल्या मनाई आदेश रद्द झाल्याची प्रत आमच्याकडे प्राप्त झाली नाही . सदर ठिकाणी बांध काम तोंडी आदेशाने चालू होते.सुरक्षितेच्या उपाय योजना करण्यात आल्या होत्या.
नारायण अंकुशे, मुख्य प्रवर्तक,
सुपर कन्स्ट्रक्शन , डिफेन्स कॉलनी फेज 4