पुणे – कपडे वाळत घालत असताना एका महिलेचा आठव्या मजल्यावरच्या गॅलरीतून पडून मृत्यू झाला. ही घटना जांभूळवाडी येथे मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पित्रादेवी हरिजी सिंग (56,रा. लेकवृड सोसायटी, जांभूळवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पित्रादेवी तीच्या सुनेसह आठव्या मजल्यावर रहातात. त्यांच्या पतीवर मुंबईत उपचार सुरु असल्याने मुलगाही मुंबईतच असतो. त्या सकाळी साडेसातच्या सुमारास गॅलरीत स्टुलवर उभ्या राहून कपडे वाळत घालत होत्या. यावेळी स्टुलवरुन तोल जाऊन त्या थेट खाली पडल्या. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.