रांजणगाव गणपती, (वार्ताहर) – रांजणगाव-बाभुळसर अष्टविनायक महामार्गावर दोन महिला रस्त्याच्या कडेला उभ्या असताना चारचाकी गाडीची धडक बसल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.
मीना रवी घेमुड (वय 42, रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरुर) असे या महिलेचे नाव आहे. याबाबत मेघा राजाराम फंड (वय 40) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अपघातानंतर वाहनचालक महेश वसंत वाळके (रा. बाभुळसर खुर्द) हा पळून गेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 मार्चला रात्री 8ः30 च्या सुमारास बाभुळसर खुर्द गावच्या हद्दीत बाभूळसर ते रांजणगावकडे जाणार्या रस्त्याच्याा कडेला साइडपट्टीवर मेघा फंड आणि त्यांची बहीण मीना घेमुड या दोघी उभ्या असताना महेश वाळके याने त्याच्याकडील पांढ-या रंगाच्या चारचाकी महींद्रा एक्सयूव्ही (एमएच 12 व्हीव्ही 7575) गाडीने मीना घेमुड हिला धडक देऊन अपघात केला आणि पळून गेला.
अपघातातात मीना घेमुड यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. वाहनचालक महेश वसंत वाळके याच्या विरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.