लग्नाळू तरूणांना लुटणाऱ्या महिलेला अटक; ‘अशी’ करत होती फसवणूक

मुंबई – विवाहाचे आमिष दाखवून विवाहेच्छू वरांना लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या महिलेला भोपाळ पोलिसांनी अटक केली. यामुळे 2015 मध्ये आलेल्या “डॉली की डोली’ या सिनेमाची अनेकांना आठवण झाली.

भोपाळच्या हरदा भागात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भोपाळच्या कोलार रस्ता परिसरात विवाहासाठी नियोजित पोहोचले त्यावेळी त्या ठिकाणाला कुलूप असल्याचे आढळले. त्यावेळी या वाग्दत्त वधू आणि तिच्या टोळीने फसवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठत रितसर फिर्याद नोंदवली.

विवाहेच्छू तरुणांना लुटणारी टोळीच कार्यरत असल्याचे भोपाळ पोलिसांनी सांगितले. ते म्हणाले, या वराला योग्य मुलगी दाखवली जाते. त्यानंतर विवाह करून देण्यासाठी रक्कम स्वीकारली जाते. विवाहाची वेळ आणि स्थळ ठरवले जाते. त्यानंतर ही टोळी त्याकडे फिरकतच नाहीत. ज्या मुलाला योग्य वधू मिळत नाही, त्या मुलाच्या कुटुंबियांना हेरून ही टोळी आपला कार्यभाग साधत असते.

या वधूचे आणि त्यांच्या टोळीतील सदस्यांचे मोबाईल क्रमांक बंद होते. मात्र त्यांना मोबाईल ट्रॅकिंगवरून हेरण्यात आले. या “वधू’सह अन्य दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. या आरोपींना शिक्षा होईल, असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

भारतीय दंड संहितेच्या कलम 420 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉली की डोलीया सिनेमात सोनम कपूर अहुजा हीने वधू बनून एका श्रीमंताला लुटल्याची भूमिका केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.