गर्भनिरोधक गोळ्या OCP किंवा संप्रेरकांचा अंतर्भाव असलेली संततीनियमनाची इतर कोणतीही साधने म्हणजे निरोगी आणि तरुण स्त्रियांसाठी गर्भारपण टाळण्यासाठीचा सर्वाधिक सोयीस्कर व सुरक्षित मार्ग असतो. मात्र आता याला पर्याय म्हणून पुरुषांसाठी आता गर्भनिरोधक जेल मार्केटमध्ये येत्या काळात येणार आहे.
गर्भनिरोधक गोळ्या स्त्रियांसाठी गर्भारधारणा टाळण्यासाठीचा सर्वाधिक सोयीस्कर असले तरी या गोळ्यामुळे काही स्त्रियांना हृदयविकार, हार्टअटॅक, स्ट्रोक्स आणि रक्तात गुठळ्या होणे अशाप्रकारच्या गंभीर समस्यांचा धोका असू शकतो. त्यामुळे संततीनियमनासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने, त्यांनी सांगितलेली पद्धत वापरणेच योग्य ठरते मात्र आता यावर ब्रिटनमध्ये हे जेल बनविण्यात आले आहे.
इंग्रजी वृत्तानुसार,एका 32 वर्षाच्या जोडप्याने एडिनबर्ग येथे पुरुष हार्मोनल गर्भनिरोधक जेलच्या वैद्यकिय चाचणीमध्ये सहभाग घेतला होता.यामध्ये त्याच्या पत्नीने त्याला साथ दिली. हे जेल लावल्याने गर्भ राहिला नाही. मात्र यादरम्यान साईड इफेक्ट्स ही पुढे त्यांना दिसून लागले. पतिचे वजन वाढले. त्यामुळे सध्या याचे साईड इफेक्ट्स न व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
याबाबत स्वःताहा या जोडप्याने वृत्त माध्यमांना आपला अनुभव शेअर केला आहे. ते म्हणाले, ‘हे लावल्यावर रात्री कधीतरी अंगात उष्णता वाढल्यासारखी जाणवायची. खूप घाम यायचा. मात्र सेक्स करताना कधी काही वेगळे जाणवले नाही. मात्र जेल लावायला सुरुवात केल्यापासून माझे तीन ते चार किलो वजन वाढले आहे.
वजन वाढल्यामुळे मला थोडा त्रास झाला, असे पतिने सांगितले. तर अचानक गरोदर राहण्याची भीती ही यात नसल्याने मी आऩंदी असल्याचे त्याची पत्नीने सांगितले. या जेलचे सकारात्मक परिणाम लक्षात घेता ही कंपनी आता सरकारकडून यासाठी परवानगी मागणार असून लवकरच हे जेल मार्केटमध्ये आणण्यासाठी कंपनीने तयारी सुरु केली आहे.