त्रिनिदाद :- वेगवान गोलंदाज महेमद सिराजने केलेल्या भेदक गोलंदाजीसमोर यजमान वेस्ट इंडीजचा पहिला डाव 255 धावांवर संपला व भारताला पहिल्या डावात 183 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली. या दोन संघात सुरु असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील या दुसऱ्या कसोटीत रविवारी चौथ्या दिवशी भारतीय संघाने उपहाराला खेळ थांबला तेव्हा आपल्या दुसऱ्या डावात 1 बाद 98 धावा केल्या आहेत. आतापर्यंत भारताकडे 281 धावांची एकूण आघाडी आहे.
It’s Lunch on Day 4 of the second #WIvIND Test! #TeamIndia zoom towards 98/1, leading West Indies by 281 runs ⚡️ ⚡️
5️⃣7️⃣ for Captain @ImRo45
3️⃣7️⃣* for @ybj_19
Scorecard ▶️ https://t.co/d6oETzoH1Z pic.twitter.com/CA3o9xn6sD
— BCCI (@BCCI) July 23, 2023
तब्बल 183 धावांच्या आघाडीनंतर भारताने आपला दुसरा डाव धडाक्यात सुरु केला. कर्णधार रोहित शर्मा व यशस्वी जयस्वाल यांनी सहाव्या षटकातच अर्धशतकी सलामी दिली. या दोघांनी वेगवान फलंदाजी केली. या जोडीने आक्रमक फटकेबाजी केली.
कर्णधार रोहित वेगवान अर्धशतक फटकावून बाद झाला. त्याने 44 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 57 धावांची खेळी केली. त्यानंतर जयस्वालने शुभमन गिलच्या साथीत डाव सावरला मात्र, त्याचवेळी मुसळधार पाऊस सुरु झाल्याने उपाहारासाठी पंचांनी खेळाडूंना निर्देश देत सामना थांबवला. यावेळी गिलला खाते उघडायचे होते तर जयस्वाल 37 धावांवर खेळत होता.
तत्पूर्वी, शनिवारच्या 5 बाद 229 धावांवरून पुढे खेळ सुरु झाल्यावर वेस्ट इंडीजच्या एलिस अथांजे व जेसन होल्डर पाठोपाठ बाद झाले. अथांजेला मुकेश कुमारने तर हेल्डरला सिराजने बाद केले.
अथांजेने 37 धावांची तर होल्डरने 15 धावांची खेळी केली. त्यानंतर वेस्ट इंडीजच्या तळातील फलंदाजांना सिराजने आपल्या गोलंदाजीसमोर टीकू दिले नाही. त्याने पाच गडी बाद करताना वेस्ट इंडीजचे शेपूट कापून काढले. सिराजला साथ देताना मुकेश कुमार व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. रवीचंद्रन अश्विनने 1 बळी घेतला.
वेस्ट इंडीजचा कर्णधार क्रेग बर्थव्हाइटने जीगरबाज 75 धावांची खेळी केली. त्याला साथ देत अथांजेने 37, तेगनरेन चंदरपॉलने 33, कीर्क मॅकेन्झीने 32 तर जेरेमी ब्लॅकवूडने 20 धावा केल्या. मात्र, भारताने पहिल्या डावात केलेल्या 438 धावांसमोर त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही व भारताला मोठी आघाडी मिळाली.