नगर, दि.16 (प्रतिनिधी) -करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना संगीतप्रेमींना विरंगुळा तसेच नवोदित कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हेल्प मी इंडियाचे ऍड. धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मिती प्रतिष्ठान व दिशा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन गायन स्पर्धेत देश-विदेशातून अनेक संगीतप्रेमी सहभागी झाले. आठ वर्षापासून तर 94 वर्षापर्यंत अनेक आबालवृद्धांनी या गायन स्पर्धेचा आनंद घेतला असल्याचे धनंजय जाधव यांनी सांगितले.
ही स्पर्धा तीन गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती.
प्रत्येक फेरीमध्ये वेगवेगळी गाणी घेण्यात आली. निवडक स्पर्धकांचे व्हिडिओ “आवाज महाराष्ट्राचा’ या यूट्यूब चैनल वर प्रसारित करण्यात आले. श्रोत्यांनी या गाण्यांना भरभरून प्रतिसाद दिला. एसएनडीटी महाविद्यालयातील संगीत विभागाच्या सुषमा पाठक यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. प्रत्येक गटातील विजेत्या तीन स्पर्धकांना पारितोषिके देण्यात येणार असून श्रोत्यांच्या आग्रहा नुसार स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे,
पहिला गट:- प्रथम क्रमांक सानिका बोभाटे, द्वितीय क्रमांक अविशी रोकडे ,तृतीय क्रमांक (विभागून) ईशीता आणि रुद्राणी रिसालदार, उत्तेजनार्थ क्रमांक (विभागून) अनुष्का कुलकर्णी, अनन्या पवार आणि कृष्णा जोशी.
दुसरा गट :- प्रथम क्रमांक डॉ.रसिका धायगुडे, द्वितीय क्रमांक सावनी सावरकर, तृतीय व्ही.माणसा, उत्तेजनार्थ क्रमांक(विभागून)योगिनी कुलकर्णी आणि पूजा पारखी.
तिसरा गट:- प्रथम क्रमांक स्नेहल रिसालदार, द्वितीय क्रमांक यशोदास क्षिरसागर, तृतीय क्रमांक स्मिता जोशी, उत्तेजनार्थ क्रमांक (विभागून) नसिबखान पठाण, शर्मिला अंतापुरकर हे स्पर्धेत विजय झाले आहेत.