पुणे – दिवाळीची सुट्टी लागल्याने नागरिक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर भर पडत आहे. त्यामुळे खरेदीचे माहेर घर समजणाऱ्या लक्ष्मी रॉड, टिळक रोड, कुमठेकर रोड. तसेच तुळशी बाग आणि मंडई परिसरात प्रचंड गर्दी झाली. त्यातच दिवाळीच्या निमित्ताने दुकानदारांनी आणि पथारी व्यवसायकांनी पद पथावर आणि काही प्रमाणात रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे पुणेकरांना इंच-इंच लढवू म्हणत आपली वाहने न्यावी लागत होती. असे चित्र होते.