Team India Head Coach & BCCI : – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी श्रीलंकेचा माजी खेळाडू महेला जयवर्धनेत स्वारस्य दाखवले आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकासाठी २७ मे पर्यंत अर्ज मागवले आहेत.
सुत्रांनुसार, बीसीसीआयने टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदासाठी काही मोठ्या नावांमध्ये रस दाखवला आहे. या यादीत गौतम गंभीर, स्टीफन फ्लेमिंग, जस्टिन लँगर आणि महेला जयवर्धने यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्वांमध्ये बोर्डाची पहिली पसंती गंभीर असल्याचीही आतली माहिती आहे. मंडळाने 13 एप्रिल रोजी रात्री उशिरा उमेदवारांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ हा तिन्ही फॉरमॅटसाठी जुलै 2024 ते डिसेंबर 2027 या साडेतीन वर्षांचा असेल.
गंभीरची कारकिर्द…
एक खेळाडू म्हणून, 2007 मध्ये भारताच्या टी-20 विश्वकरंडक विजयात आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वकरंडक विजयात गंभीरचा सहभाग होता. त्याने 2011 ते 2017 या सात आयपीएल हंगामांसाठी कोलकाताचे नेतृत्व केले आणि ते पाच वेळा प्लेऑफसाठी पात्र ठरले. कर्णधार म्हणून त्याने 2012 आणि 2014 मध्ये दोन विजेतेपदही पटकावले होते.