माळेगाव-एखादी संधी मिळाली तर स्वीकारणार का? या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, जनतेने आम्हाला विरोधी भूमिका बजावण्याची संधी दिलेली आहे. ती आम्ही सक्षमपणे पार पाडू सरकारने मागील पाच वर्षांत राज्यात कारभार चाललेला आहे. तसाच कारभार पुन्हा चालू ठेवला तर आम्ही जनतेच्या हितासाठी त्यांना जोरदार विरोध करू आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावू असे प्रतिपादन रोहित पवार यांनी केले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली या चर्चेबाबत रोहित पवार म्हणाले की, ही भेट एक औपचारिक भेट होती. राजकीय विषयाबाबत चर्चा झाली नाही. प्रतिस्पर्धी उमेदवार राम शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिल्या बाबत विचारले असता ते म्हणाले, लोकशाहीत सर्वांनाच सहभाग महत्वाचा असतो. शिंदे यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न केले. हार जीत होत असते. जनतेच्या विकासासाठी मी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. ही संस्कृती आहे आणि पवार साहेबांची शिकवण आहे.