पुणे – शहरासह जिल्ह्यात करोना विषाणूने पुन्हा डोके वर काढल्यामुळे बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पंधरा दिवसांपूर्वी हिंजवडीच्या विप्रो हॉस्पिटलमध्ये केवळ 35 बाधित उपचार घेत होते. मात्र, आज ही संख्या तब्ब्ल 218 वर पोहचली आहे.
दररोज, 25 ते 30 बाधित नव्याने दाखल होत असून, बाधितांचा तात्काळ बेड उपलब्ध व्हावा यासाठी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांनी दिली.
हिंजवडी येथील विप्रो कोव्हिड हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांची संख्या गेल्या पंधरा दिवसात पाच ते सहा पटीने वाढली आहे. त्यामुळे प्रत्येकी दहा एमबीबीएस आणि 10 बीएचएमएस डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे. हिंजवडी येथील विप्रो हॉस्पिटल मध्ये ग्रामीण भागातील रुग्णांच्या उपचारांची अद्यावत सुविधा आहे. 450 बेड क्षमता असणाऱ्या या रुग्णालयामध्ये आहे.