दबंग सीरीजमध्ये चुलबुल पांडेची भूमिका साकारल्यानंतर सलमान खान पुन्हा एकदा कॉपच्या भूमिकेस झळकणार आहे. सलमान “इंडियाज मोस्ट वॉन्टेड कॉप ः राधे’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग 4 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. याचा एक फोटो व्हायरल झाला असून यावरून हा चित्रपट पुढील वर्षी ईदनिमित्त प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
बॉलिवूडमधील सिनेमॅटॉग्रफर अयाननका बोस यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यात चित्रपटाच्या शूटिंगचे शेड्यूल दर्शविण्यात आले आहे. या पोस्टसह असे लिहिण्यात आले ओ की, “लॉक्ड और लोडेड! कोई अंदाजा कौन सी फिल्म? हिंट: ईद’
या चित्रपटाला “दबंग-3’चे दिग्दर्शक प्रभु देवाच दिग्दर्शित करणार आहेत. 2017मध्ये प्रदर्शित झालेल्या कोरियन चित्रपट “द आउटलॉज’चे अडैप्टेशन असणार आहे. या चित्रपटाचे कथानक असा एका पोलीस अधिका-याचे आहे ज्याला शहरातील गॅगवार संपुष्टात आणण्याची जबाबदारी देण्यात येते.
दरम्यान, सलमान खान याने नुकतेच आपल्या आगामी “दबंग-3′ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा, सुदीप किच्चा आणि अरबाज खान यांनी काम केले आहे. याशिवाय महेश मांजरेकरची मुलगी सई या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.