लूजरचा शिक्का भारत पुसणार का?

पुणे: भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या दुसऱ्या सामन्याला येथील गहुंजे मैदानावर सुरुवात झाली आहे. पहिल्या कसोटीत विजय मिळवून या भारतीय संघ 1-0 असा आघाडीवर आहे.

दुसऱ्या कसोटीत विजय मिळवला तर संघ ही मालिका खिशात टाकेल, पण मागच्या 6 वर्षांत भारताला पुण्याच्याच मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला होता. या कालावधीत भारताने 23 कसोटी जिंकल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाने 2017 साली पुण्याच्या याच मैदानावर भारताला 333 धावांनी हरवले होते. दक्षिण आफ्रिकेचा भारतात शेवटचा विजय 2010 साली झाला होता. नागपूर कसोटीत दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि 6 धावांनी विजय मिळवला होता. दक्षिण आफ्रिकेने आपला डाव 6 बाद 558 धावांवर घोषित केला होता. यानंतर भारताचा पहिला डाव 233 आणि दुसरा डाव 319 धावांवर संपुष्टात आला होता.

विशाखापट्टणमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत भारताचा 203 धावांनी विजय झाला होता. यात रोहित शर्माने दोन्ही डावांत शतक झळकावले. तर मयंक अग्रवालने पहिल्या डावामध्ये द्विशतक केले होते. चेतेश्वर पुजाराने 81 धावांची खेळी केली, तर अश्विनने सामन्यात मिळून 8 बळी घेतले होते. रवींद्र जडेजाने 6 आणि शमीने 5 बळी मिळविले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.