मुंबई – राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फुटीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले.राज्यातील दोन महत्वाच्या पक्षात फूट पडल्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपाचं समीकरण काय असेल? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. अशातच बारामती लोकसभा (baramati Loksabha) मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार (Sunetra pawar) असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती.बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील यावर भाष्य केले. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा निवडणूक वाढविण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सुनेत्रा पवार बारामती लोकसभा (Sunetra pawar baramati loksabha) मतदारसंघातून निवडणूक लढणार याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून राजकीय वर्तुळात केवळ चर्चा सुरु होत्या. यामुळे बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय असा लढा पाहायला मिळणार का ? याची उत्सुकता सर्वांना लागून होती. अशात आता अजित पवार (Ajit Pawar sunetra pawar loksabha) यांनी सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा निवडणूक लढण्याबाबत भाष्य केलं आहे.
सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवणार का ? या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,”आम्ही त्यावर विचार करू.. जेव्हा वेळ जेईल तेव्हा त्या त्या गोष्टीचा विचार केला जाईल” असं देखील त्यांना यावेळी स्पष्ट केले. (Sunetra Pawar fight against Supriya Sule)
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या होत्या
सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) बारामती लोकसभा मतदारसंघातून ( Baramati Lok Sabha Constituency) निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेबाबत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना विचारले असताना, त्या म्हणाल्या की, “माझं म्हणणं आहे की , आमच्याकडे तरी लोकशाही आहे. दिल्लीत काय दडपशाही चालते, हे संपूर्ण देश पाहतोय. पण आमच्याकडे लोकशाहीच आहे. त्यामुळे मला वाटतं की, कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. आपण या सगळ्या गोष्टींचा मान-सन्मान केला पाहिजे.”
“भारतीय जनता पार्टी तीन वेळा माझ्या विरोधात निवडणूक लढली. यावेळीही कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. मी लोकशाहीचं मनापासून स्वागत करते. ही लोकशाही जगली पाहिजे, टिकली पाहिजे.. आपण अशा सर्व निर्णयांचं पूर्ण ताकदीने स्वागत केलंच पाहिजे. कुणीतरी विरोधात लढलंच पाहिजे,” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली होती.