हॉलीवूड स्टार विल स्मिथ लवकरच अँटोनी फुक्का यांच्या “इमेनसिपेशन’ या थ्रिलर चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट विलियम एन. कोलाज द्वारा लिखित पीटर नामक एका फरार गुलामच्या सत्य कथेवर आधारित आहे. यात निर्दयी शिकारींपासून बचाव करत त्याला गुलामीतून मुक्त होण्यासाठी फरार व्हावे लागते. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी 2021मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
स्मिथ द्वारा सह-निर्मित या चित्रपटाचे काम कोविड-19 महामारीमुळे सध्या बंद आहे. तसेच स्मिथची बायॉपिक “किंग रिचर्ड’चे शूटिंगही थांबविण्यात आले आहे. यात त्याने आघाडीची टेनिसपटू व्हिनस आणि विलियम्सच्या वडील आणि प्रशिक्षक रिचड विलियम्स यांची भूमिका साकारत आहे.
दरम्यान, हॉलिवुडमधील कलाकारांनाही बॉलीवूडचे आकर्षण असल्याचे दिसून आले आहे. याला विल स्मिथही अपवाद नाही. गतवर्षी 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या “स्टूडेंट ऑफ द इयर-2’मध्ये त्याने कॅमियोची भूमिका साकारली होती. तो पहिल्यांदाच बॉलीवूडमध्ये झळकला होता. यात तो एका गाण्यात थिरकताना दिसला होता.