Sharmila Thackeray : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष मैदानात उतरला असल्याचे दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे – भाजप पक्षासोसबत युती करणार का असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून रंगला आहे. अशात आता चर्चा अशीही आहे की राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे लोकसभेच्या रिंगणात उतरणार का?
दरम्यान, पुण्यातील कार्यक्रमात शर्मिला ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याने चर्चा रंगली आहे. दिल्लीत पाठवलं तर दुधात साखर पडेल, असं सूचक वक्तव्य पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केलं. त्यामुळे शर्मिला ठाकरे यांच्याकडून लोकसभा निवडणुकीचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
पुण्यातील “कोंढव्याची सौभाग्यवती 2024” कार्यक्रम आयोजित केला होता. यादरम्यान शर्मिला ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित होत्या. याच कार्यक्रमात शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांना आता महापालिकेत पाहायचं नसून मोठ्या पदावर पाहायचं असल्याचे सांगितेल.