Karnataka Election Results 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 34 वर्षांनंतर काँग्रेसने जागांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. काँग्रेसच्या खात्यात 136 जागा आल्या आहेत. या विजयामुळे काँग्रेसचे सर्व नेते आनंदी दिसत आहेत. या विजयाबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या निवडणुकीच्या वेळी अतिशय सक्रिय दिसल्या, या विजयाने आपल्यावर मोठी जबाबदारी आल्याचे त्यांनी म्हंटले.
#WATCH | #KarnatakaElectionResults | “As I said, this (coming to power in Karnataka) is a huge responsibility. We went to the people with a few guarantees & we have to fulfill them. We have to work for the people. Public will tell us what will happen next,” says Priyanka Gandhi… pic.twitter.com/8m7LT89WTf
— ANI (@ANI) May 13, 2023
2024 मध्ये राहुल गांधी पंतप्रधान होणार का?
काँग्रेस पक्षाचा प्रचंड बहुमताने विजय झाल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना विचारले की, 2024 मध्ये राहुल गांधी पंतप्रधान होणार असल्याच्या चर्चा आहेत, त्याबद्दल तुमचे काय मत आहे? या प्रश्नाला उत्तर देताना प्रियांका गांधी म्हणाल्या, “हे बघा, मी म्हटल्याप्रमाणे ही खूप मोठी जबाबदारी आहे, आम्ही जनतेसमोर काही हमीपत्रे घेतली आहेत, ती पूर्ण करायची आहेत आणि पुढे काय होईल ते जनताच सांगेल.”
तत्पूर्वी, प्रियंका गांधी यांनी कर्नाटकच्या जनतेचे अभिनंदन करत ट्विट केले आणि लिहिले, “काँग्रेस पक्षावर ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल कर्नाटकच्या जनतेचे मनापासून आभार! कन्नड लोकांनी भ्रष्टाचार, जातीयवाद, महागाई विरोधात मतदान केले, कर्नाटकच्या जनतेचे मी मनापासून आभार मानते. काँग्रेस कार्यकर्ते आणि कर्नाटक काँग्रेस नेते जे आपल्या देशाला एकत्र आणण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी करत आहेत. तुमच्या सततच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. काँग्रेस पक्ष कर्नाटकच्या जनतेला दिलेली आश्वासने नक्कीच पूर्ण करेल.”
काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी शनिवारी आशा व्यक्त केली की 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील. या विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना ते म्हणाले, “हा एका धर्मनिरपेक्ष पक्षाचा विजय आहे… कर्नाटकच्या लोकांना आश्वासनाप्रमाणे काम करणारे आणि काँग्रेसला जनादेश देणारे स्थिर सरकार हवे होते.”