पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत 7 हजार चौरस किलोमीटर आणि 800 गावांचा समावेश होतो. या हद्दीचा विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने पीएमआरडीएला एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
जुलै 2017 मध्ये या संपूर्ण हद्दीचा विकास आराखडा तयार करण्याचा इरादा पीएमआरडीकडून हाती घेण्यात आला होता. तरतुदीनुसार इरादा जाहीर केल्यानंतर दोन वर्षांत तो पूर्ण करणे अपेक्षित होते.
मात्र, आराखड्यापूर्वी हद्दीसाठीची बांधकाम नियमावलीस सरकारकडून मान्यता देण्यात आली. त्यामुळे लवकरच हद्दीचा प्रारूप विकास आराखडा हरकती-सूचनांसाठी प्रसिद्ध केला जाईल, असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मुदत संपल्यानंतरही विकास आराखड्याचे प्रारूप तयार झालेले नाही. निवडणुकांमुळे हा आराखडा मुदतीत होऊ शकला नाही.