पवार रणनीती अस्मान दाखवणार?

जळोची – आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्याविरुद्ध भाजपकडून रणनीती आखली जात आहे. विधानसभा निवडणुकीत पवारांचा गड असलेली बारामती कशी जिंकता येईल, याबाबतची व्यूहरचना आखली जात आहे. मात्र राष्ट्रवादीने बारामती विधानसभा मतदार संघात केलेली विकासकामे; कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह अजित पवारांचा थेट जनतेशी असणारा दांडगा जनसंपर्क याच्या जोरावर आजवर पवारांना सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून दिले जात असल्याचा इतिहास आहे. त्यामुळे आगामी काळात पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत भाजपकडून पवारांना शह देणार की पवार रणनीती पुन्हा एकदा भाजपला अस्मान दाखवणार? हे पाहावे लागणार आहे.

चंद्रकात पाटील बारामतीत पुन्हा तळ ठोकणार
लोकसभा निवडणुकीवेळी कांचन कुल यांच्या विजयासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील बारामतीत तळ ठोकून होते. आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात भाजपाची ताकद वाढवण्याबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वारु रोखण्यासाठी व पवारांना आव्हान देण्यासाठी पुन्हा एकदा पाटील पवार बंगल्याशेजारीच स्थापलेल्या भाजप कार्यालयात तळ ठोकणार आहे. याआधी आम्ही बारामतीकडे संघटनाबांधणीकडे विशेष लक्ष दिलं नव्हतं, पण आता त्यात सुधारणा करणार, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.