Nostradamus । प्रख्यात फ्रेंच भविष्यकार नॉस्त्राडॅमस याने वर्तवलेली बहुतेक भविष्यवाणी आतापर्यंत खरी ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर त्याने 2024 मध्ये भयानक मोठे युद्ध होण्याची जी भविष्यवाणी केली आहे. ती खरी ठरणार का याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये इस्त्रायल आणि इराण यांच्यामधील सुरू असलेल्या संघर्ष किंवा पॅलेस्टाईन आणि इस्त्रायल यांच्यामधील संघर्ष असो किंवा गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेले युक्रेन आणि रशिया यांच्यामधील युद्ध असो या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही भविष्यवाणी खरे ठरते की काय अशी शक्यता व्यक्त होत आहे.
नॉस्त्राडॅमसने व्यक्त केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे 2024 मध्ये सर्वात मोठे सागरी युद्ध लढले जाण्याची शक्यता आहे. इराण आणि इस्त्राईल यांच्यातील संघर्षामुळे मध्यपूर्व प्रदेशातील तणाव वाढला आहे. हा तणाव असाच वाढत गेला तर या युद्धाला तिसऱ्या महायुद्धाचे स्वरूप प्राप्त होऊ शकते. त्याने आपल्या भविष्यवाणीमध्ये युद्धाचे जे वर्णन केले आहे ते पाहता विद्यमान परिस्थिती त्याच प्रकारची आहे.
इस्रायल पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष असो किंवा युक्रेन रशिया यांच्यातील संघर्ष असो या दोन्ही घटनांच्या निमित्ताने जगाची दोन गटांमध्ये विभागणी झाली आहे. या पार्श्वभूमीवर नॉस्त्राडॅमसने व्यक्त केलेले भविष्य सत्यात येण्याची परिस्थिती निर्माण झाल्या आहे असे दिसते.