पुणे: पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम ठेवावी अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी आज केली आहे, लवकरच ते मुख्यमंत्र्यांची व नगर विकास सचिवांची भेट घेऊन तसे पत्र देणार आहेत
मिळकत करातील ४० टक्के सवलत १/८/२०१९ पासून स्व:वापर करीत असलेल्या निवासी मिळकतीची काढण्यात येऊ नये आणि देखभाल दुरुस्ती खर्च १/४/२०१० पासून १५ टक्क्यांहून १० टक्के फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशा प्रमुख मागण्या यावेळी शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी केल्या आहेत.
समाविष्ट गावे यांना देखील या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळे हा निर्णय निश्चित होणार आहे असा विश्वास देखील त्यांनी समाविष्ट गावकऱ्यांना दिला.