नवी दिल्ली – काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपल्या लंडन दौऱ्यावेळी अनेक विधाने केली आहेत ज्यामुळे भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेसकडून राहुल गांधी यांचा एक सूट घातलेल्या पेहरावातील फोटो शेअर करण्यात आला होता यानंतर भाजप नेत्याने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ज्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.
याआधी राहुल गांधींचा एक फोटो समोर आला होता, ज्यामध्ये त्यांचा संपूर्ण लुक बदललेला दिसत होता. भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी त्यांच्या दाढीमुळे चर्चेत आले होते. मात्र, आता राहुल गांधींनी त्यांचा संपूर्ण लुकच बदलला आहे. राहुल गांधींचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये त्यांनी दाढी ट्रिम केली आहे.यानंतर काँग्रेस पक्षाने आपल्या ट्विटर हँडलवरून राहुल गांधींचा एक नवीन फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये राहुल गांधी सूट घातलेले दिसत आहेत. ‘तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता त्यासाठी उभे राहा, भलेही तुम्ही एकटे असाल’ असे हटके कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे.
Stand up for what you believe in, even if it means you stand alone. pic.twitter.com/dV3fG4NfB9
— Congress (@INCIndia) March 6, 2023
राहुल गांधींच्या या फोटोवर नागालँडचे राज्य प्रमुख टेमजेन इमना अलोंग यांनी भाष्य केलं आहे.टेमजेन यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत ‘निदान कॅप्शन तरी स्वतःचे लिहा” असा टोला काँग्रेसला लगावला आहे. टेमजेन यांनी काँग्रेसने कॅप्शन मध्ये टाकलेल्या स्लोगनचा गुगलवरील फोटो देखील यावेळी शेअर केला आहे.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींबाबत प्रश्न उपस्थित केले
भारतीय सीमेत चीनच्या घुसखोरीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णपणे ‘नकारण्याच्या स्थितीत’ असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. लंडनमधील इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनशी झालेल्या संभाषणात त्यांनी सांगितले की, आम्ही कोणालाही आमच्या हद्दीत घुसखोरी करू देत नाही आणि आम्ही धमकीलाली घाबरत नाही. पण अलीकडच्या काळात चिनी लोकांनी आमच्या हद्दीत घुसून आमच्या सैनिकांना ठार मारले, पण पंतप्रधान मात्र पूर्णपणे नकार देत आहेत. हीच मोठी समस्या आहे.