उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होणार का ? प्रियंका गांधी म्हणाल्या…

नवी दिल्ली – काँग्रेसनेत्या प्रियंका गांधी यांच्यावर पक्षाकडून उत्तर प्रदेश राज्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रियंका गांधी देखील उत्तर प्रदेशात सक्रिय झाल्या असून मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशातील प्रत्येक घटनेवर त्या लक्ष ठेवून असतात. त्यातच त्यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होणार का, असा प्रश्न विचारण्यात आला.

तुम्ही राज्यात येता. त्यावरून लोक म्हणतात प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्री बनवायच आहे. तुम्ही उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर प्रियंका म्हणाल्या की, मी माझ कर्तव्य निभावत आहे. लोकांची मदत करणं हेच आपल कर्तव्य आहे. जनतेचा आवाज बुलंद करणेच माझ कर्तव्य आहे. गेल्या वर्षी मी मुजफ्फरनगर, मेरठ, बिजनोर येथे गेले होते. आता पुन्हा जाणार आहे. लोक दु:खी आहेत. जनतेची आवाज ऐकला पाहिजे. जेणेकरून त्यांना न्याय मिळेल, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं.

उत्तर प्रदेशात आपण लढणार आहोत. न्यायासाठी माझी लढाई सुरू राहणार असल्याचे प्रियंका गांधी यांनी सांगितले. मात्र मुख्यमंत्री होणार का या प्रश्नाला त्यांनी बगल दिली.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.