ब्रुसेल्स, (बेल्जियम): बेल्जियमचे राजे फिलीप यांचे भाचे आणि राजपुत्र जाओचिम यांना करोना विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. स्पेनमध्ये लॉकडाऊनदरम्यान झालेल्या पार्टीला उपस्थित राहिल्यानंतर त्यांची करोना विषाणूची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये हा संसर्ग झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे स्थानिक वर्तमानपत्राच्या माध्यमातील वृत्तामध्ये म्हटले आहे.
राजघराण्यातील काही सदस्य एका पार्टीसाठी एका खासगी निवासस्थानी मुक्कामाला थांबले होते. त्याठिकाणी 27 जणांच्या उपस्थितीमध्ये एक पार्टी आयोजित केली गेली होती. राजपुत्र जिओचीम यांच्यामध्ये दिसणारी करोनाची लक्षणे खूपच सौम्य आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लगेच उपचारांना सुरुवात केली गेली आहे.
मोरोक्कोचे युवराज फिलीप द्वितीय हे करोनाचा संसर्ग झालेले राजघराण्यातील प्रथम व्यक्ती मानले जात आहेत. मार्च महिन्यात मोरोक्कोच्या राजघराण्याने या संबंधीच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. हा संसर्ग होण्यापूर्वी फिलीप यांनी करोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी काही मूलभूत सुविधा जाहीर केल्या होत्या. ब्रिटनच्या राजघराण्यातही करोनाची लागण झाल्याचे उदाहरण समोर आले होते. युवराज चार्ल्स यांनाही मार्च महिन्यात करोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. याच कालावधीमध्ये बोर्बोर्न पार्मा येथील स्पेनच्या राजकुमारी मारीया तेरेसा यांचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला होता.