मुंबई : देशात सध्या कोरोनाव्हायरसमुळे थैमान माजलं आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने हा आजार मोठ्या प्रमाणात पसरतो. महाराष्ट्रात सर्वाधिक लोक संक्रमित झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. दरम्यान, या लॉकडाउनमध्ये अनेक धार्मिक स्थळंही बंद आहेत. परंतु काही ठिकाणी मशिदींमध्ये नमाज पठण करण्यात येत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यावरून प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी भारतातील मशिदीही बंद करण्याची मागणी केली आहे.
Tahir Mehmood Saheb an scholar n the Ex chairman of the minority commision has asked Darul ulum Deoband to give a Fatwa to close all the mosques till corona crisis is there. I totally support his demand If Kaaba n the mosque in Madina canbe closed down why not Indian mosques
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) March 30, 2020
जावेद अख्तर यांनी ट्विट केल आहे की,’जो पर्यंत देशावर करोनाचं संकट आहे तोवर सर्व मशिदी बंद करण्यात याव्यात असा दारूल देवबंदनं फतवा काढण्याची मागणी एक स्कॉलर आणि अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष ताहिर महमूद यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीचं मी समर्थन करतो. जर काबा आणि मदिना येथील मशिदी बंद होऊ शकतात तर भारतातील का नाही,” अशा आशयाचं ट्विट जावेद अख्तर यांनी केलं आहे.