ईशान का अस्वस्थ आहे? 

शाहीद कपूरचा लहान भाऊ ईशान खट्टर हा आपल्या भावाप्रमाणे सिनेसृष्टीत चमक दाखवू शकलेला नाही, ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. त्याचे यापूर्वीचे दोन्ही चित्रपट दणकून आपटले आहेत. त्यानंतर आता चालूवर्षी इशानचे “खाली पिली’ आणि “सुटेबल बॉय’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. मात्र तरीही ईशान सध्या डिप्रेशनमध्ये आहे.

याचे कारण त्याची जीवाभावाची मैत्रीण जान्हवी कपूर गेल्या काही दिवसांपासून त्याला फारसा भाव देत नाहीये. त्यामुळे इशान सध्या अस्वस्थ आहे. त्यामुळेच त्याने आपल्या जीमची आणि डान्स क्‍लासची वेळ बदलून घेतली आहे. इतकेच नव्हे तर इशानने अक्षत रंजन या आपल्या पूर्वीच्या मित्रासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इशानचा स्वभाव सध्या अत्यंत अस्थिर बनला आहे. तो जान्हवीला भेटण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे.

काहीही कारण काढून, प्लॅनिंग करून किंवा बहाणा करून एखाद्या पार्टीमध्ये जान्हवीसोबत जाता येईल यासाठी तो प्रयत्नशील आहे. पण अचानक जान्हवीने त्याच्यापासून लांब राहायला का सुरुवात केली आहे, याचे कारण समजेनासे झाले आहे. काहींच्या मते, त्या दोघांचे नाते एकतर्फी झाले होते, तर काही जण म्हणतात की, अनन्या पांडेसोबतची इशानची मैत्री जान्हवीला आवडत नव्हती. खरे कारण काय आहे ते जान्हवीच जाणो! पण इशानबाबा सांभाळ रे स्वतःला!

 

Leave A Reply

Your email address will not be published.