ए.आय.एस.एस.एम.एस मध्ये वाडियाच्या विध्यार्थ्यांचे यश

पुणे: ए.आय.एस.एस.एम.एस महाविद्यालयात २५ फेब्रुवारी २०२० या तारखेला आय.इ.आय अंतर्गत, टेकनोविशन २०२० ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत कुसरो वाडिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरगोस यश मिळवले.ही एक राज्यस्तरीय पेपर प्रेझेन्टेशन स्पर्धा होती. या स्पर्धेत राज्यातील विविध भागातील विध्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. कुसरो वाडिया महाविद्यालयातील अणुविद्युत विभागाच्या प्रेषित गुजर आणि विवित्त चंद्रसेखरन आणि यंत्र अभियांत्रिकी विभागाचे सत्यम सोमवंशी आणि शुभम थिटे यांनी पेपर प्रेझेन्टेशन प्रतियोगीतात पहिला पारितोषिक पटकावला.

प्रेषित व विवित्त यांनी उत्तमरीत्या ‘रोबोटिक्स इन हेल्थकेअर आणि नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर’ या विषयावर पेपर सादर केले तर सत्यम व शुभम यांनी हैपरळूप (इरा ऑफ ट्रान्स्पोर्टेशन) या विषयावर पेपर सादर केले. त्यांना ए.आय.एस.एस.एम.एस महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रथम बक्षीस देऊन सन्मानित केले. कुसरो वाडिया महाविद्यालयाचे अणुविद्युत विभागाचे विभाग प्रमुख डॉ.ए.एस.चांडक , यंत्र अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.यु.एन.कांबळे, प्रा. शुभांगी वर्मा आणि प्रा.आर.झेड.देशमुख यांनी त्यांना उत्तेजित व प्रोत्साहित केले. प्राचार्य व्ही.आर.राव यांनी अभिनंदन केले. संपूर्ण महाविद्यालयाला त्यांचा अभिमान आहे.
– श्रेया अंबेटी,
कॉलेज रिपोर्टर,
कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.