सौंदर्यवतीची नृत्यकला 

सौंदर्यवती स्पर्धांमधून सिनेसृष्टीत दाखल झालेल्या तारकांमध्ये आता मानुषी थिल्लरचेही नाव जोडले गेले आहे. लवकरच ती बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षयकुमारच्या “पृथ्वीराज चौहान’ या चित्रपटातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.

मानुषीचा हा पहिलावहिला हिंदी चित्रपट असल्यामुळे तिला आणि तिच्या चाहत्यांना याबाबत खूप उत्सुकता आहे. अनेकांना हे माहीत नसेल की, 2017 मध्ये मिस वर्ल्ड बनलेली मानुषी एक व्यावसायिक क्‍लासिकल डान्सरही आहे. तिने राजा, राधा रेड्डी आणि कौशल्या रेड्डी यांच्याकडून कुचिपुडीचे प्रशिक्षण घेतलेले आहे. याबाबत स्वतः मानुषी सांगते की, सकाळी लवकर उठून कुचिपुडीचा सराव करण्याची सवय मला चित्रीकरणादरम्यान कामी आली. तिचा खूप फायदा झाला.

मानुषी सांगते की, मी जेव्हा लहान होते तेव्हा क्‍लासिकल डान्सचे घेतलेले प्रशिक्षण मला पृथ्वीराजच्या चित्रीकरणासाठी खूप उपयोगी पडले. ज्या डान्सच्या स्टेप्स मला करायच्या होत्या, त्याबाबत मला फारसं दडपण आले नाही. उलट मी खूप उत्साही होते. त्यामुळेच सरावा दरम्यान मी अत्यंत आत्मविश्‍वासाने नृत्य करु शकले.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.