मुंबई – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे अनेक बोल्ड फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. वयाची चाळीशी ओलंडल्यानंतरही तिचे सौंदर्य तरुणींना लाजवले असे आहे. मात्र श्वेताप्रमाणे तिची लेक पलक तिवारी देखील अनेकदा चर्चेत राहिली आहे. सध्या सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि पलकच्या अफेअर चर्चा देखील सुरू आहेत. यातच आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पलक तिवारी एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. यावेळी रेड कार्पेटवर तिने ईशान खट्टरला अॅटिट्युड दाखवला. हे पाहून पलकला सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल करण्यात आले आहे. मुंबईत एक अवॉर्ड सोहळ्यादरम्यान तमन्ना भाटिया, आयुष्मान खुराना, , विजय वर्मा, सान्या मल्होत्रा यासारखे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहिले होते.
यावेळी ईशान खट्ट्रर रेड कार्पेटवर माध्यमांना पोज देत होता. तर पलक तिवारी बाजूला खाली मान घालून उभी होती. फोटो काढून झाल्यानंतर इशान खट्टर गप्पा मारत पुढे येत होता. तेव्हा इशानने पलककडे पाहिलं पण ती मात्र खाली मान घालून चेहऱ्यावर हसू न ठेवता उभी होती. त्याचा हा अॅटिट्युड नेटकऱ्यांना चांगलाच खटकला आहे.
View this post on Instagram
तिचा हा व्हिडिओ पाहून एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘एवढा कसला अॅटिट्यूड आहे.’ तर दुसरऱ्याने लिहिले की, ‘हिचा अॅटिट्यूड तर बघा’ तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, ‘काहीतरी गडबड दिसत आहे. तिला इशान अजिबातच आवडत नाही असं दिसत आहे.’ दरम्यान, पलक ‘बिजली बिजली’ या गाण्यातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या गाण्यामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
श्वेताप्रमाणे तिची लेक पलक तिवारीने देखील बॉलीवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. पलकने सलमान खानच्या ‘किसीका भाई किसी की जान’ या चित्रपटात काम केले आहे.