मुंबई – काही दिवसांपूर्वीच दीपिका पदुकोणने “छपाक’ या आपल्या पुढच्या सिनेमाचे शुटिंग सुरू केले होते. या सिनेमात दीपिका ऍसिड हल्ल्यातील पीडीत मुलीचा रोल करते आहे. अलीकडे तिचा लुक खूपच हटके असल्याने त्यासाठी मेकअप आर्टिस्टना खूपच कष्ट घ्यायला लागतात. तब्बल दीपिकाच्या मेकअपसाठी दरवेळी किमान 3 ते 4 तासांचा अवधी लागतो.
अशा अनेक चर्चा छपाक या चित्रपटतील लूकमुळे सोशल माध्यमांमध्ये सुरु होत्या. मात्र आता सोशल माध्यमांमध्ये नो मेकअप लुकमुळे तिचे फोटोला युजर्सकडून चांगलीच दाद मिळाली आहे.
छपाकच्या शूटिंगदरम्यान दीपिकाने जगप्रसिद्ध वोग इंडिया मॅगझिनसाठी एक फोटोशूट केले. तिच्या या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या ग्लॅमरस फोटोशूटमध्ये दीपिका ‘नो मेकअप लूक’मध्ये दिसतेय.