व्हॉटसऍप वाढवेल तुमच्या स्मार्टफोनची मेमरी

स्मार्टफोनमध्ये आपण महत्त्वाचे ऍप्स आणि डॉक्‍यूमेंटस सेव्ह करून ठेवतो, तसेच स्मार्टफोनमध्ये अनेक अशा गोष्टी असतात ज्यामुळे फोनची मेमरी कमी होते. त्यापैकीच एक म्हणजे व्हॉटसऍप मीडिया फाईल्स. जरी आपण व्हॉटसऍप ग्रूप म्यूट केला तरी स्मार्टफोनमधील मेमरी ही वापरली जाते. व्हॉटसऍपचा फक्त कॉलिंग आणि मॅसेजिंगसाठी नाहीतर आणखी बऱ्याच गोष्टीसाठी उपयोग होतो. व्हॉटसऍपव्दारे तुम्ही स्मार्टफोनची मेमरी देखील बूस्ट करू शकता. त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनची मेमरी वाढू शकते.

व्हॉटसव्दारे स्मार्टफोनची मेमरी बूस्ट करण्यासाठीच्या स्टेप्स –
– सर्वात आधी व्हॉटसऍप ओपन करून सेटिंग्समध्ये जा.
– त्यानंतर ऊरींर Data and Storage usage वर क्‍लिक करा.
– त्यानंतर Storage Usage हा पर्याय मिळेल. त्यावर क्‍लिक केल्यास व्हॉटसऍप मित्रांची आणि ग्रूपची लिस्ट दिसेल. येथे कॉन्टॅक्‍ट (contacts) आणि ग्रुप चॅटससाठी वापरलेली मेमरी स्टोरेज दिसेल.
– या लिस्टमधील जो कॉन्टक्‍सट किंवा ग्रुप तुमच्या उपयोगाचा नाही त्यावर क्‍लिक करा. त्यानंतर येथे तुम्हाला सर्वात खालच्या ठिकाणी Free Up Space दिसेल, त्यावर क्‍लिक करा.
– त्यानंतर तुम्हाला डिलीट करण्यासाठी Photos, Audio, Videos, Document, Stickers असे पर्याय दिसतील, यापैकी जे नकोय ते सिलेक्‍ट करा आणि डिलीट आयटमसवर क्‍लिक करा. असं केल्याने तुमच्या स्मार्ट फोनची मेमरी काही अंशी तरी का होईना, पण नक्कीच वाढेल.

– स्वप्निल हजारे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)