पुणे – राज्यभरासह पुणे व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नद्या, नाले तसेच धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. मात्र या कालावधीत धरण फुटले, रस्ता खचला तसेच पुल कोसळला असे मेसेज समाज माध्यमात पसरत आहेत. या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असं आवाहन पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी केले आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पुणे पोलीस आयुक्तांचे आवाहन ..
Appeal by Pune City Police Commissioner against rumour mongering.. @DGPMaharashtra @CPPuneCity @PuneCityTraffic .. pic.twitter.com/rAy1WTPjRE— PUNE POLICE (@PuneCityPolice) August 7, 2019
तसेच आवश्यक माहिती तसेच खात्रीसाठी पोलिस नियंत्रण कक्षाला ( 020 261 26296 ) तसेच व्हाॅटसअॅप (Whatsapp) क्रमांक 8975283100 वर संपर्क साधावा. तसेच खोटी माहिती पसरवून नागरिकांत भय निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे देखील आवाहन डॉ. के. वेंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्याकडून करण्यात आले आहे.