साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना बॉलिवूडमध्ये धमाका करण्यास सज्ज झाली आहे. गुड बाय या चित्रपटात रश्मिका दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रश्मिकाचा बॉलिवूड चित्रपटांमधील अभिनय पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत. अशातच चाहते आता सोशल मीडियावर अशी चर्चा करू लागले आहे की,’साऊथमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या रश्मिकाने बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय का घेतला?’ याचे उत्तर आता रश्मिकानेच दिले आहे.
View this post on Instagram
शुक्रवारी रश्मिकाने तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मीडियाची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. यादरम्यान रश्मिकाने ती बॉलिवूडमध्ये का आली हे सांगितले. रश्मिका म्हणाली की, ‘मी माझ्या चाहत्यांसाठी येथे आले आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, रश्मिकाने मीडियाशी बोलताना सांगितले की, ‘माझ्यासाठी मी हिंदी स्क्रिप्ट्स ऐकायला सुरुवात केली कारण प्रेक्षकांना ते हवे होते. मी इथे येऊन काम करावे अशी त्यांची इच्छा होती. मला इथे माझे काम बघायचे आहे असेही ती म्हणाली. त्यानंतर पुष्पा हा चित्रपट आला आणि या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद यामुळेच मी आज गुड बाय चित्रपट करते आहे.
View this post on Instagram
विकास बहल गुड बायचे दिग्दर्शन करत आहे आणि त्यात पावेल गुलाटी, एली अवराम, सुनील ग्रोवर, साहिल मेहता यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी रिलीज होणार आहे.
या चित्रपटाव्यतिरिक्त रश्मिकाकडे आणखी 2 हिंदी चित्रपट आहेत. ती मिशन मजनू आणि एनिमल या चित्रपटात दिसणार आहे. मिशन मजनूमध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे, तर अॅनिमलमध्ये ती रणबीर कपूर, अनिल कपूर, परिणीती चोप्रा यांच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.